View in English

मी बौद्ध आहे का ? वाचा आणि विचार करा…

  1. जो बौद्ध आहे तो देव या कल्पनेवर विश्वास ठेवत नाही.View in English
  2. जो बौद्ध आहे तो हिंदू धर्मातील देव – देवता मानत नाही.
  3. जी महिला बौद्ध आहे ती देवाचा उपवास करीत नाही.
  4. जो बौद्ध आहे तो भूत मंत्र चमत्कार यावर विश्वास ठेवत नाही.
  5. जो बौद्ध आहे तो प्राणी हत्या करीत नाही.
  6. जो बौद्ध आहे तो चोरी करीत नाही.
  7. जो बौद्ध आहे तो व्यभिचार करीत नाही.
  8. जो बौद्ध आहे तो खोटे बोलत नाही.
  9. जो बौद्ध आहे तो दारू सिगरेट तंबाखू इत्यादी व्यसन करीत नाही.
  10. जो बौद्ध आहे तो तथागत भगवान बुध्दांनी सांगितलेल्या मार्गाचा पालन करतो.
  11. जो बौद्ध आहे तो दुसऱ्यांची निन्दा करीत नाही.
  12. जो बौद्ध आहे तो दुसऱ्यांशी आदराने बोलतो.
  13. जो बौद्ध आहे तो दुसऱ्यांचा मंगल होण्याची भावना मनात ठेवतो.
  14. जो बौद्ध आहे तो पैसा, शिक्षण यांचा गर्व करीत नाही.
  15. जो बौद्ध आहे तो सर्व लोकांवर समान मैत्री करतो.
  16. जो बौद्ध आहे तो वाईट माणसांशी मैत्री करीत नाही.
  17. जो बौद्ध आहे तो धम्मदान करतो.
  18. जो बौद्ध आहे तो आपल्या मुलांना चांगले संस्कार देतो.
  19. जो बौद्ध आहे तो आई वडिलांची सेवा करतो.
  20. जो बौद्ध आहे तो स्त्रियांना समान वागणूक देतो.
  21. जो बौद्ध आहे तो आपल्या पत्नीचा आदर करतो.
  22. जो बौद्ध आहे तो आत्मा परमात्म्याला मानत नाही.
  23. जो बौद्ध आहे तो आई वडील मरण पावले असता डोक्याचे केस कापत नाही, कावळ्यांना अन्न देत नाही.
  24. जो बौद्ध आहे तो घरात लिंबू नारळ बांधत नाही.
  25. जो बौद्ध आहे तो शुभ कार्यक्रमा मध्ये दारू वाटत नाही.
  26. जो बौद्ध आहे तो लग्नात हळद लावत नाही.
  27. जो बौद्ध आहे तो हुंडा घेत नाही.
  28. जी बौद्ध महिला आहे ती हळद कुंकू समारंभ करीत नाही.
  29. जो बौद्ध आहे तो आपल्या धम्म प्रतिज्ञाचे पालन करतो.
  30. जो बौद्ध आहे तो दिवाळी, होळी, दही-हंडी, रक्षाबंधन इत्यादी हिंदू धर्माचे सण साजरे करीत नाही.
  31. जो बौद्ध आहे तो धम्म वाढवण्यासाठी प्रचार आणि प्रसारास मदत करतो.

सुचना

 

  1. ज्यांना हिंदू देव व हिंदू संस्कृती आवडत आसेल, त्यांनी विचार करावा कि बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धाम्माशी गद्दारी करत आहोत का?
  2. प्रत्येक बौद्धाने धम्माची माहिती करून घ्यावे.
  3. मुलांना धम्माची माहिती सांगावे.
  4. त्रिशरण व पंचशीलाची पूजा घरात प्रत्येक कुटुंबियांनी नियमित करावे.
  5. जवळच्या विहारात आठवड्यातून एकदा आपल्या कुटुंब आणि मित्रमंडळी सह जावे आणि धम्माचा ज्ञान वाढवावे.
  6. प्रत्येक बौद्ध स्थळाला भेट द्यावे जसे चैत्यभूमी, दीक्षाभूमी, महाबोधी विहार, कान्हेरी-लेणी, कारला-भाजा लेणी, नाशिक त्रीरश्मी लेणी, लोणावळा बुद्ध लेणी, महाड बुद्ध लेणी, अजंता बुद्ध लेणी.
  7. आपल्या घरात तथागत भगवान बुद्ध, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतीमेशिवाय कोणत्याही दगडधोंड्याच्या प्रतिमा असता कामा नये.
  8. आपली धाम्मशक्ती संगठीत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
  9. आपल्या मुलांना उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर, इंजीनियर, लेखक, व्यापारी, शास्त्रज्ञ होण्यास प्रवृत्त करावे.
  10. आपले घर, आपला परिसर, शहर स्वच्छ ठेवण्यास सहाय करावे.

 

Published in Public interest by BAIAE, Japan and Chaityabhumi Management Community.
Based on Extensive research from Chaityabhumi Management Community.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *